Daughters Day Wishes In Marathi | जागतिक कन्या दिनानिमित्त खास शुभेच्छा

Daughters Day Wishes In Marathi:- Happy Daughters Day Quotes, Wishes, Messages In Marathi 2023, Daughters Day Quotes

Daughters Day Wishes In Marathi 

आज जागतिक कन्या दिन
ज्यांना कन्या रत्न आहेत अशा
सर्वांना जागतिक कन्या
दिनाच्या मनापासून शुभेच्छा

मुलगी म्हणजे आनंद मुलगी म्हणजे

चैतन्य मुलगी म्हणजे ज्योती मुलगी

म्हणजे सौख्याच औक्षण…

जागतिक कन्या दिनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा!

 

मुलगी शिकली प्रगती झाली
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
पहिली बेटी धनाची पेटी..
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
लेक म्हणजे ईश्वराची देणं,
लेक म्हणजे अमृताचे बोल,
तिच्या पाऊलखुणांनी,
सुख ही होई अनमोल.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
सुगंध, प्रेम आणि मुली,
हे जिथले असतात तिथे थांबत नाहीत.
त्यामुळे मुलींवर भरपूर प्रेम करा आणि
त्यांच्या सहवासाचा सुगंध दरवळत राहू द्या.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा
मुली ह्या देव्हाऱ्यातील निरागस फुलं
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
लेक माझी आनंदाची ठेवण
लेकीसाठी माझे सारे जीवन अर्पण
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
घरामध्ये जणू संगीत असतं प्रत्येक क्षणी,
जेव्हा मुली पैंजण घालून घरभर चालतात.
घरामध्ये प्रसन्नता ही मुलींमुळे असते,
कारण त्यांच्यामुळे घरांमध्ये असतो प्रकाश.
डॉटर्स डे च्या शुभेच्छा.
छोटी छकुली अशी असावी
प्रत्येकाच्या घरी एक तरी लेक असावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक माझी आदर्शमायाळू शिदोरी, प्रेमळ आणि साहसी
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
एक तरी मुलगी असावी, कळी उमलताना पाहता यावी,
मनातील गुपितं तिने हळुच माझ्या कानी सांगावी.
जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
लक्ष्मीच्या पायांनी जी घरात येते,
जिच्या पैंजणांनी सारे घर निनादते,
जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते,
जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झळाळून टाकते,
हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते,
ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
कुणाची ती बहिण असते,
कुणाची ती आई असते,
कुणाची पत्नी, तर कुणाची सून असते,
पण याआधी ती आई-वडिलांची लाडाची लेक असते.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
मी नसेल आई दिवा वंशाचा,
मी आहे दिव्यातील वात,
नाव चालवेन कुळाचे बाबा,
मोठी होऊनी जगात.
राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक हे असं खास फुल आहे जे प्रत्येक बागेत फुलत नाही.
माझ्या बागेत फुललं यासाठी देवा मी तुझा आभारी आहे.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
लेक माझी भाग्याची, राजकन्या आहे घराची.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
एक तरी मुलगी सुनेच्या रूपात मिळावी,
लेकीची सर तिने थोडीतरी भरून काढावी.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
माझी लेक म्हणजे आनंदाचा झरा,
माझी लेक म्हणजे वात्सल्याचा दुवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा
मुलगी आहे अंगणाची तुळस
तीच खरी आहे अस्तित्वाचा कळस.
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
तुझ्या केवळ अस्तित्वाने रोम रोम माझे झंकारले, तूझ्या येण्याने जीवन माझे सार्थक झाले.
तू सप्तसूर माझे, तू श्वास अंतरीचा तुझ्यामुळे कळाला मज अर्थ जीवनाचा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा.

माझ्या प्रिय लेकीस,

तू माझ्या सर्व प्रार्थना आणि इच्छांचे उत्तर आहेस,

तुझ्यासारख्या मुलीचा आशीर्वाद मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे!

कन्या दिनाच्या शुभेच्छा!

 

मुली वडिलांसाठी सर्वस्व असतात

कन्या दिनाच्या शुभेच्छा!

 मुलींवर करा प्रेम,

कारण त्याच तुमच्यावर करतात उपकार.

कन्या दिनाच्या शुभेच्छा!

तुमच्या मुलींचा आदर करा,
कारण त्या आदरणीय आहेत,
कन्या दिनाच्या शुभेच्छा!
तुझ्यामुळे मज आईपण मिळालं कसं सांगू तुला, माझ्या बकुळीच्या फुला.
जागतिक कन्या दिन शुभेच्छा

ती आई आहे, ती ताई आहे

ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे

ती मुलगी आहे,ती जन्म आहे

ती माया आहे तीच सुरुवात आहे

आणि सुरुवात नसेल तर बाकी

सर्व व्यर्थ आहे

जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 स्वागत तुझे मी कसे करावे

अचंबित हे सारे जग व्हावे

तुझ्या गोड हास्याने जीवन

माझे फुलुनी जावे

जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

मुली ह्या जन्मताच मजबूत असतात
तुम्ही त्यांना आणखी साहसी करा
कन्या दिनाच्या शुभेच्छा!

लक्ष्मीच्या पावलांनी जी घरात येते

जिच्या पैंजनांनी सारे घर निनादते

जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते

हे सर्व सुख त्याच्याच नशिबी येते

ज्याच्या घरी मुलगी जन्माला येते

जागतिक कन्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

पाहुनी रूप गोंडस मनी माया दाटते,
अशी कळी मग गर्भातच का नकोशी वाटते.
मुलींना जगवा, मुलींना वाचवा.
कन्या दिनाच्या शुभेच्छा

You may also like...