Dohale Jevan Wishes in Marathi:- डोहाळे जेवण (Dohale Jevan) अर्थात (Baby Shower) हा एक गरोदरपणातील एक महत्त्वाचा सोहळा आहे, जिथे आईला भेटवस्तू, आशीर्वाद आणि मेजवानी ओटी देखील भरली जाते. भारताच्या काही भागात याला “गोध भराई” असेही म्हणतात. हा समारंभ सामान्यतः गर्भधारणेच्या सातव्या किंवा नवव्या महिन्यात आयोजित केला जातो आणि गर्भवती आईचे कुटुंब आणि मित्र मोठ्या उत्साहाने साजरा करतात. “डोहाळे” या शब्दाचा अर्थ फुलांनी सजवलेला झुला आणि “जेवन” म्हणजे मेजवानी. झुला हा समारंभाचा एक महत्त्वाचा भाग आहे, आणि आई त्यावर बसते तर तिचे प्रियजन पारंपारिक मराठी गाणी गातात आणि तिला आणि जन्मलेल्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी विविध विधी करतात.
Dohale Jevan Wishes in Marathi
तुझं आयुष्य आता पहिल्यासारखं जरी नाही राहीलं, तर चांगल्यासाठी हे बदल होत आहेत. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या आनंदासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. डोहाळे जेवण आहे तुझ्यासाठी खास आणि आहेत आमच्याही शुभेच्छा.
आयुष्यातील सर्वात मोठं सुख आता तुझ्या आयुष्यात येणार आहे. या आनंदासाठी तू तयार राहा
कोणीतरी येणार येणार ग… ज्याच्या कोमल स्पर्शाने तुझं अंग सारं न्हाऊन जाणार ग. त्याच्या गोड आवाजाने घर सारं दुमून जाणार ग. तोच होणार तुझा आधार, तोच तुझ्या भाग्याचा दिवा ठरणार ग. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
संपूर्ण घरादाराला परिपूर्ण करणारी कळी तुझ्या अंगणात फुलणार आहे, त्या कळीच्या मधुर सुगंधाने तुम्हा सर्वांचे आयुष्य दरवळणार आहे. डोहाळे जेवणाच्या शुभेच्छा.
लक्ष्मीच्या रूपाने गोड परी यावी तुझ्या दारी, डोहाळ जेवणाच्या तुझ्या या सोहळ्याला रंगत यावी न्यारी, डोहाळ जेवणाच्या सोहळ्याला शुभेच्छा द्यायला जमलो आम्ही मंडळी सारी. डोहाळ जेवणाच्या शुभेच्छा.
आई होणं म्हणजे जगातलं सर्वात मोठं सुख आहे, ते सुख आता थोड्याच दिवसात तुझ्या आयुष्यात येणार आहे. तुला आणि तुझ्या होणाऱ्या बाळाला खूप सारे सुख व आशीर्वाद मिळो हीच देवाकडे प्रार्थना डोहाळ जेवणाच्या गोड शुभेच्छा.
जेव्हा तू आई होशील तेव्हा खरा स्वर्ग काय असतो याचा अनुभव तुला येईल, बाळाच्या मधुर आवाजाने व नाजूक स्पर्शाने मन तुझे भरून जाईल. डोहाळ जेवण शुभेच्छा.
लहान बाळांचे हसणे, त्यांचे आपले असणे आणि त्यांचा निरागस सहवास लवकरच तुझ्या आयुष्यात येणार आहे, तुझ्या आणि तुझ्या बाळासाठी डोहाळे जेवणाला खास आशीर्वाद आणि डोहाळे जेवण शुभेच्छा!
आयुष्यातील सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे लहान बाळ. आयुष्यभराचा आहे हा आशीर्वाद, डोहाळे जेवण शुभेच्छा!