Gudi Padwa Wishes In Marathi | गुढीपाडवा शुभेच्छा संदेश 2024

Gudi Padwa Wishes In Marathi (Gudi Padwa 2024) Gudi Padwa Quotes In Marathi 2024, Gudi Padwa Sms In Marathi 

Gudi Padwa Wishes In Marathi

Gudi Padwa Wishes In Marathi

दुःख सारे विसरुन जाऊ,
सुख देवाच्या चरनी वाहू..
स्वप्ने उरलेली नव्या या वर्षी,
नव्या नजरेने नव्याने पाहू…
Happy Gudi Padwa

नवीन पल्लवी वृषलतांची, नवीन आशा नववर्षाची, चंद्रकोरही नवीन दिसते, नवीन घडी ही आनंदाची, गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

“गुढी उभारू आनंदाची,

समृद्धीची, आरोग्याची,

समाधानाची आणि उत्तुंग यशाची,

नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या शुभेच्छा” 

गुढी उभारून आकाशी,

बांधून तोरण दाराशी,

काढून रांगोळी अंगणी,

हर्ष पेरुनी मनोमनी,

करू सुरुवात नव वर्षाची…

गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 

श्रीखंड पूरी,

रेशमी गुढी,

लिंबाचे पान,

नव वर्ष जाओ छान..

आमच्या सर्वांच्या तर्फे

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

हॅप्पी गुढी पाड़वा…! 

वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गायी मंजुळ गाणी,

नव वर्ष आज शुभ दिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी.

गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा

साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा तुरा !

मंगलमय गुढी ल्याली भरजरी खण स्नेहाने

साजरा करा पाडव्याचा सण ! 

नव्या संकल्पांनी करूया नववर्षाचा शुभारंभ, गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. 

वसंताची पहाट घेऊन आली,

नवचैतन्याचा गोडवा,

समृद्धीची गुढी उभारू,

आला चैत्र पाडवा..

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

“नक्षीदार काठीवरी रेशमी वस्त्र,

त्याच्यावर चांदीचा लोटा,

उभारुनी मराठी मनाची गुढी,

साजरा करूया हा गुढीपाडवा…

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा” 

सोनेरी पहाट,

उंच गुढीचा थाट..

आनंदाची उधळण,

अन सुखांची बरसात..

दिवस सोनेरी,

नव्या वर्षाची सुरुवात..

गुढीपाडव्याच्या भरभरून शुभेच्छा! 

नूतन वर्ष आणि गुडी पाढव्याच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समृद्धी, निरामय आरोग्य आणि प्रेम घेऊन येवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना! 

“सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस..

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा सोन्यासारख्या लोकांना..

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा” 

“उभारून आनंदाची गुढी दारी,

जीवनात येवो रंगात न्यारी,

पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांशा,

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा” 

आशेची पालवी, सुखाचा मोहर,

समृद्धीची गुढी, समाधानाच्या गाठी,

नववर्षाच्या शुभेच्छा, तुमच्यासाठी…

गुडीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! 

नविन दिशा, खुप आशा,

नविन सकाळ, सुंदर विचार,

नविन आनंद, मन बेधुंद,

आज सुरु होते, शुभ नविन वर्ष…

Happy Gudi Padwa  

नेसून साडी माळून गजरा

उभी राहिली गुढी,

नव वर्षाच्या स्वागताची

ही तर पारंपारिक रूढी,

रचल्या रांगोळ्या दारोदारी

नटले सारे अंगण,

प्रफुल्लीत होवो तुमचे जीवन

सुगंधीत जसे चंदन…

नूतनवर्षाभिनंदन !! 

निळ्या निळ्या आभाळी शोभे उंच गुडी…

नवे नवे वर्ष आले

घेऊन गुळासाखरेची गोडी…

गुडीपाडव्याच्या शुभेच्छा… 

गुढी मराठी संस्कृतीची गुढी मराठी अस्मितेची!

आपणांस व आपल्या परिवारास

हिंदु नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा  

जल्लोष नववर्षाचा…

मराठी अस्मितेचा…

हिंदू संस्कृतीचा…

सण उत्साहाचा…

मराठी मनाचा 

आनंदाचे तोरण लागो दारी

सुंदर रांगोळी अवतरे अंगणी,

सुखासमाधानाचे असो

आगामी वर्ष ही सदिच्छा..

नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

गुढीपाडव्याच्या मंगलदिनी

जगताना आठीला आलेले

कडू अनुभव

लिंबाच्या पानासारखे

स्वीकारत

भलेपणाचा गोडवा

ओठावर ठेवावा

असा पाडवा

समजूतदार असावा

अशा समंजस नववर्षाचे

मन:पूर्वक स्वागत!

गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा! 

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा. हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 

चैतन्यमय झाला सारा परिसर नव्या पालवीने

गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाची सुरूवात करू

पुन्हा सकारात्मकतेने

मराठी नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! 

You may also like...