Holi Wishes In Marathi | होळीच्या शुभेच्छा संदेश 2024

Holi Wishes In Marathi (Holi Messages In Marathi) Holi Quotes In Marathi, Holi SMS in Marathi, Rangpanchmi 2024, Holi Status in marathi 

Holi Wishes In Marathi

Holi Wishes In Marathi

होळी पौर्णिमेच्या तुम्हाला
व तुमच्या गोड परिवाराला हार्दिक शुभेच्छा..!
Happy Holi!
हॅप्पी होळी

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,

रंग नात्यांचा, रंग बंधाचा,

रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा,

रंग नव्या उत्सवाचा साजरा करू होळी संगे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

सुखाच्या रंगांनी आपले

जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा

समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा! 

रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधाचा 
रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
रंग नव्या उत्सावाचा साजरा
करू होळी संगे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,

निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,

अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,  
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी 
तुम्हाला व तुमच्या परिवाराला 
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

भेटीलागी आले। रंगांचे सोयरे।

म्हणती काय रे। रंग तुझा।।

वदलो बा माझी ।पाण्याचीच जात।

भेटल्या रंगात। मिसळतो।।

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

रंगीबेरंगी रंगाचा सण हा आला,
होळी पेटता उठल्या ज्वाळा,
दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला,
सण आनंदे साजरा केला…
क्षणभर बाजूला सारू
रोजच्या वापरातले वाईट क्षण,
रंग गुलाल उधळू आणि,
रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण…
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

होळीच करायची तर

अहंकाराची,  असत्याची, अन्यायाची,

जातीयतेची, धर्मवादाची,

हुंडा प्रथेची, भ्रष्ट्राचाराची,  निंदेची, आळसाची,

गर्वाची, दु:खाची होळी करा

तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा 

पाणी जपुनिया,

घेऊ पर्यावरण समृद्धीचा वसा…

होळी खेळण्यास

प्रेमाचा एक रंगच पुरेसा

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

‘लाल’ रंग तुमच्या गालांसाठी,

‘काळा’ रंग तुमच्या केसांसाठी,

‘निळा’ रंग तुमच्या डोळ्यांसाठी,

‘पिवळा’ रंग तुमच्या हातांसाठी,

‘गुलाबी’ रंग तुमच्या होठांसाठी,

‘पांढरा’ रंग तुमच्या मनासाठी,

‘हिरवा’ रंग तुमच्या आरोग्यासाठी,

होळीच्या या सात रंगांसोबत,

तुमचे जीवन रंगून जावो…

होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा! 

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना

आयुष्यात येणाऱ्या सर्व तेजस्वी रंगछटांबद्दल शुभेच्छा.

होळीचा आनंद साजरा करा!

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

थंड रंगस्पर्श

मनी नवहर्ष

अखंड रंगबंध

जगी सर्वधुंद…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

सुखाच्या रंगांनी आपले जीवन रंगीबेरंगी होवो,

होळीच्या ज्वाळेत वाईटाचा समूळ नष्ट होवो !

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

मत्सर,  द्वेष, मतभेद विसरू 

प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू…

अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, 

आली होळी आली रे…

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

रंग साठले मनी अंतरी 

उधळू त्यांना नभी चला 

आला आला रंगोत्सव हा आला …

तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा  

मिठीत घेऊन विचारले तिने कोणता रंग लावू तुला…

मी पण सांगितले तिला मला फक्त तुझ्या ओठांचा रंग पसंत आहे

होळीच्या हार्दिक शुभेच्छा ! 

जीवनाच्या वाटेवर कळ्यांचे बांध फुटून जातात

वाहून जाते श्वासाचे पाणी

तरीही मैत्रीचा अंकुर तग धरून राहतो

कारण भिजत राहतात त्या आठवणी

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

रंगबिरंगी रंगाचा सण हा आला

होळी पेटता उठ

ल्या ज्वाला

दृष्टवृत्तीचा अंत हा झाला

सण आनंदे साजरा केला. 

होळी, रंगपंचमीचा सण रंगांचा

आगळ्यावेगळ्या ढंगाचा

वर्षाव करी आनंदाचा

होळीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा 

होळी पेटू दे

रंग उधळू दे

द्वेष जळू दे

अवघ्या जीवनात

नवे रंग भरू दे !

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 

होळी दर वर्षी येते

आणि सर्वांना रंगून जाते

ते रंग निघून जातात

पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

धुळवडीचे रंग खेळताना पाण्याची

नासाडी होणार नाही याची दक्षता घेऊ.

कोरडे आणि नैसर्गिक रंग वापरुन

या सणाचा आनंद द्विगुणित करू.

होळी आणि धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा 

होळी संगे केर कचरा जाळू

झाडे वाचवू अन् कचरा हटवू

निसर्ग रक्षणाचे महत्त्व पटवू

होळीच्या हार्दिक शुभेच्छा 

वाईट गोष्टी विसरून चांगल्या गोष्टींचा

आनंद लुटणे म्हणजे होळी होय!

तुमचे आयुष्य रंगीबेरंगी आणि यशस्वी होवो.

तुम्हाला होळीच्या खूप-खूप शुभेच्छा! 

“नवयुग होळीचा संदेश नवा

आरोग्य जपा,

झाडे लावा, झाडे जगवा

करूया अग्निदेवतेची पूजा..

होळी सजवा गोव-यांनी

होळीच्या शुभेच्छा साऱ्यांना” 

You may also like...