Swatantra veer Savarkar Quotes in Marathi | स्वातंत्र्य वीर सावरकर विचार

Swatantra veer Savarkar Quotes in Marathi:- Veer Savarkar Quotes In Marathi, Savarkar Jayanti Quotes In Marathi (Savarkar Thoughts In Marathi)

Swatantra veer Savarkar Quotes in Marathi

हे मातृभूमी तुझंसाठी मरण ते जनन, तुजविण जनन ते मरण

अनादी मी आणि अनंत मी अवध्य मी भला, मारील रिपु जगती असा कवण जन्माला.

आपल्या प्रामाणिकपणाचा वापर होईल पण केव्हा, तर दुसऱ्यास प्रामाणिक बनविण्याइतका आपला प्रामाणिकपणा बलवान असेल तेव्हाच .

मनुष्याची खरी शक्ती कोणती – ती म्हणजे स्वतःला खऱ्या अर्थाने ओळखणे, जाणून घेणे.

उदात्त ध्येयासाठी केलेले बलिदान कधीही वाया जात नाही – विनायक दामोदर सावरकर

कष्टच तर ती शक्ती आहे जे माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि यशाकडे नेण्यास मदत करते – स्वातंत्र्यवीर सावरकर.

जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही.

(देशहित जपताना) या जगात देवही माणसांच्या तोंडून येणाऱ्या प्रार्थनापेक्षा तोफांच्या तोंडातुन येणाऱ्या प्रार्थनांकडे जास्त लक्ष देतो – विनायक दामोदर सावरकर

पतितांनाच उद्धरण्याचे कार्य राष्ट्रीय हितास आवश्यक आहे

आपल्यास देण्याची योग्यता आहे तितके शब्द तरी शाब्दिक बौद्धिक राष्ट्रीय नि आत्मीय शिक्षण देण्याचे कार्य आपण करत राहिले पाहिजे

जीवनात प्रतिकूलता आली तर निराश होऊ नका. कारण, ही प्रतिकूलतेचीच शक्ती माणसाच्या खऱ्या गुणांचे, मूल्यांचे मूल्यांकन करते आणि त्याला आयुष्याच्या प्रगतीपथावर घेऊन जाते.

मनुष्याच्या सर्व शक्ती या त्याने स्वतःला ओळखण्यात आहेत – स्वातंत्र्यवीर सावरकर.

अनेक फुले फूलती | फुलोनिया सुकोन जाती ||
कोणी त्यांची महती गणती ठेविली असे |
मात्र अमर होय ती वंशलता|
निर्वंश जिचा देशाकरिता – वीर सावरकर

तयारी मध्ये शांतता असणे आणि अंमलबजावणीत धैर्य असणे. संकटाच्या समयी आपला हाच एक संरक्षक शब्द असावा.

ज्येष्ठांच्या अनुमतीसाठी अडून बसायचे नसते, त्यांच्या आशिर्वादाची अपेक्षा बाळगायची असते – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर

अहिंदू म्हणून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळाले तरी ते लाथाडून शेवटचा हिंदू म्हणून मी मरेन! – देशभक्त सावरकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

आपण एकटे असलो तरी हरकत नाही. आपल्यामागे कुणी येवो ना येवो
जे आपल्याला करावंसं वाटतं ते करण्यातच आपल्या जीवनाची सार्थकता आहे – वीर सावरकर
नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा , मज भरतभूमिचा तारा ।।
प्रासाद इथे भव्य परी मज भारी आईची झोपडी प्यारी ।।

शिवाजी उत्सव करण्याचा अधिकार त्यांनाच आहे की, जे शिवाजीसारखे आपल्या या पारतंत्र मातृभूमीला स्वतंत्र करण्यासाठी झुंजायला सिद्ध आहेत – वीर सावरकर

आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाच्या स्वातंत्र्यासाठी देवाची मुक प्रार्थना ही देखील सर्वात मोठ्या अहिंसेचे लक्षण आहे.

 एक देव एक देश एक आशा ।।
एक जाती एक जीव एक आशा ।।

यंत्राने बेकारी वाढत नाही तर विषम वाटणीमुळे वाढते – स्वातंत्र्यवीर सावरकर

कष्ट हीच जी शक्ती आहे, जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते आणि उज्वल यशाकडे नेण्यास सहाय्य करते.

आपल्या प्रामाणिकपणाचा वापर केव्हा होईल, जेव्हा आपला प्रामाणिकपणा दुसऱ्यास प्रामाणिक बनवण्यास बलवान असेल तेव्हा होईल.

You may also like...