Wedding Invitation Quotes In Marathi:- Marriage Invitation Message In Marathi, Lagnache Nimantran Message in marathi, Lagna Quotes in marathi
Wedding Invitation Quotes In Marathi
अक्षधांची उधळण, मांगल्याचा क्षण,दोन घराण्याचा संगम, संसार ससीतेचा उगम,दोन परिवाराचे मंगलमय मिलन,आपण सहपरिवार लग्नाला यावे हेच___ परिवाराचे आग्रहाचे निमंत्रण…
दोन जीवांच्या स्वप्नाची परिपूर्ती करणाऱ्या
या पवित्र संस्कार सोहळ्यास
आपण सहपरिवार उपस्थित राहून
आशिर्वाद द्यावेत ही आग्रहाची विनंती.
पाऊस क्षणाचा, पण गारवा कायमचा…
मैत्री दोन जीवाची, मंगल सोहळा एक दिवसाचा…
भेट क्षणाची, पण आशिर्वाद महत्वाचा…
म्हणूनच आपले येणे महत्त्वाचे,
करिता आग्रहाचे निमंत्रण ____ परिवाराचे…!
एक नाजूक धागा… नातं प्रेमाचं, त्यात गुंफले मनी…गुंफण विश्वासाचं, मध्यभागी दोरलं…त्यातून तयार होत मंगळसूत्र,जे असतं अखंड लेंन सौभाग्याचं,आग्रहाचं निमंत्रण ____ परिवाराचं…
सोनेरी पहाट, जन्माची गाठ,(नवरदेव)च्या संसाराला(नवरी)ची साथ,दिवस आहे __वार मुहूर्त आहे खास,(नवरदेव) आणि (नवरी)च्या डोक्यावरठेवा आशीर्वादाचा हात…… !
माहेर सोडून सासरी गेली,
वडिलांची लेक परकी झाली,
बहीण भावाची आशा संपली,
_ परिवाराची मुलगी होती __ परिवाराची सून झाली.
प्रथम पुजावा श्री गणपती । धन्य ती भारतीय संस्कृती ।। ज्ञानेश्वराने चालवल्या भिंती । अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी ।। सर्व काही ईश्वराच्या हाती । तोच जुळवितो नाती – गोती ।। वधु-वरास आशिर्वाद द्यावेत हीच आमची नम्र विनंती ।।
आयुष्याच्या वेलीवर हळुवार पांन..
म्हटले तर दोन जीवांना जोडणारा प्रेमाचा धागा…!
म्हटले तर दोन कुटुंबांना जोडणारा एक स्नेहबंध…!
सात जन्माची गाठी जुळवणारा हा सोहळा…!
आपल्या शुभेच्छा आणि आशिर्वादा शिवाय
अपूर्ण म्हणूनच.. या मंगल प्रसंगी
आपली उपस्थिती हवीच…!
मेघांनी आनंद कण वर्षावे.
इंद्रधनुनी सप्तरंगी द्यावी.
वसुंधरेने धैर्य द्यावे,
आभाळाणे छत्र धरावे,
आणि वधू वराचे अवघे
जीवन सुखी व्हावे
असे आशिर्वाद कायमचे द्यावे.
हेच ____ परिवाराचे
आग्रहाचे निमंत्रण समजावे.
आमचे येथे ईश्वर कृपेने
सोबत दर्शविलेल्या
मंगल कार्यास उपस्थित राहून
वधू वरास शुभाशीर्वाद द्यावे,
ही विनंती.
माती मधून निघतो मोती,
सर्व काही जगांन्नाथाच्या हाती,
तोच जुळवितो नाती – गोती,
तेव्हाच मिळतो जीवन साथी.
आपण यावे लग्न समारंभाला,
ही विनंती ____ परिवाराची.
नवयुगाच्या शितल प्रकशात,
पवित्र संस्काराच्या दिव्य मार्गावर,
दोन हृदय एकत्र होऊन गृहस्थाश्रमात
पदार्पण करीत असलेल्या नवोदित
वधू वरास आपल्या आशीर्वादाने
उपकृत करावे ही विनंती.
प्रेमाचा शब्द, स्नेहाचा स्पर्श,
आपुलकीचे मन, कौतुकाची शाप,
मधुर हास्य, मनात कोरलेल्या भावना,
हृदयस्पर्शी जिव्हाळा असलेला
हाऋणानुबंधाचा मंगल सोहळा
आपल्या भावनास्पर्शाने संपन्न
होण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण…
क्षणभर भेट आयुष्यभराची मैत्री ठरावी,
क्षणाच्या मंगल मुहूर्ताने आयुष्यभर नाती जुळावी,
तसेच क्षणभराच्या आपल्या उपस्थितीने..
वधूवरांना मंगलमय आयुष्यासाठी शुभ आशीर्वाद मिळावेत
यासाठी या शुभविवाह सोहळ्याचे सस्नेह निमंत्रण..!
प्रेमाला असते विश्वासाची साथ,
कळीला असते फुलण्याची वाट,
तसेच दोन जुळत्या मनाला असते
एकत्र जगण्याची आस म्हणून
____ परिवारात उपस्थित राहून बांधा
____ व ____ यांची जन्मठेपेची गाठ…!