Jari Jhala Barister Lyrics – Milind Shinde

Jari Jhala Barister Lyrics by Milind Shinde is latest bheemgeet song sung by Milind Shinde

Jari Jhala Barister Lyrics

जरी झाला बॅरिस्टर तरी पडला ना विसर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर

नको पुरणाची पोळी,आणि गोडधोड खाया
वाटू लसणाची चटणी,संग तोंडी लावाया
तो अति आनंदानं, बाई जेवंल पोटभर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर

चिकनं चोपडं खायाचा,नाही भीमाला शौक
या समाजसेवेची,त्याला लागलीया भूक
पंचपक्वान्न स्वादिष्ट,ना जेवला वेळेवर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर

त्या गोऱ्या सायबाचा,होता गुलामाला धाक
पण बाबासायबानी, कापलं गुलामीच नाक
त्यानं मारिली ठोकर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर

आडातलं भरलय, त्या गडी संजयानी
तांब्याभरून देऊ, त्याला माठातलं पानी
हे जेवण जिरवाया, टाकू दुधात साखर
भीम आवडीनं बाई, खाई कांदा न भाकर 

You may also like...