Satyanarayan Pooja Ukhane in Marathi:- Marathi Ukhane For Satyanarayan Pooja, Ukhane For Satyanarayan Pooja
Satyanarayan Pooja Ukhane in Marathi
सत्यनारायणाच्या पूजेने करू, नवीन कार्याची सुरवात,
——रावांचे नाव घेऊन, देवापुढे लावते फुल-वात.
महादेवाच्या पूजेला बेलाच्या राशी, …–रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
बहुतेकांनी वाचले असेल, पुस्तक रामायण,
—रावांचे नाव घेते, आज आहे सत्यनारायण.
हंसराज पक्षी दिसतात खूप हौशी, …—रावांचे नाव घेते सत्यनारायण पूजेच्या दिवशी
सासूबाईंनी ठेवले, खूप खुश सुनेला,
—रावांसोबत बसेन आज, सत्यनारायणाच्या पूजेला.
चांदीच्या वाटीत वाढलाय गाजराचा हलवा, …रावांचे नाव घेते सासूबाईंना बोलवा
गणपती बाप्पाला आवडती, तलावातील कमळे,
—–रावांसोबत, माहेर विसरून रमले.
धनत्रयोदशीला पूजा करतात ऐश्वर्य व धनाची, … रावांचे नाव घेते आज पूजा आहे सत्यनारायणाची
श्रावणात महादेवाला, दुधाचा अभिषेक,
—–रावांच्या नावाने, बेल वाहिले एकशे एक.
श्रीकृष्णाने सांगितली अर्जुनला भगवद्गीता, …चा आहे मी राम तर ती आहे माझी सीता
पूजेला ठेवले आहे, भात आणि वरण,
—–रावांचे नाव घ्यायला आहे, सत्यनारायण पूजेचे कारण.
सत्यनारायणापुढे लावली समईची जोडी, … रावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी
पावसाळ्यात आकाशात, कडकडतात विजा,
—-रावांसोबत करते आज, सत्यनारायणाची पूजा.
सत्यनारायण देवाला हार घालते वाकून,
——रावांचे नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून