भुमि अभिलेख अंतर्गत अमरावती, नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद या जिल्ह्या करिता भूकरमापक तथा लिपिक पदांच्या एकूण १०००+ पेक्ष्या जास्त जागा भरण्याकरिता पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती करिता नोकरीचे ठिकाण विविध जिल्हे विभाग आहेत. अर्ज सुरु होण्याची तारीख 9 डिसेंबर 2021 आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 आहे.
पात्रता :
1) मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातील किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका ( diploma in civil engineering ) किंवा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केल्यावर मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दोन वर्षांचे सर्वेक्षक व्यवसायाचे प्रमाणपत्र.
2) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40
श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.
टिप : उपरोक्त क्रमांक 2 मध्ये नमूद टंकलेखन विषयक अर्हता पूर्ण करीत नसलेली व्यक्ती सदर पदासाठी अर्ज करण्यास पात्र ठरेल. परंतु अशा व्यक्तीने सदर अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील. नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत सदर अर्हता धारण न केल्यास तो/ती सेवा समाप्तीस पात्र राहील.
विभागानुसार भरावयाच्या पदांचा तपशील :
कोकण प्रदेश, मुंबई : एकूण जागा 244
औरंगाबाद विभाग : एकूण जागा 207
नागपूर विभाग : एकूण जागा 189
नाशिक विभाग : एकूण जागा 102
पुणे विभाग : एकूण जागा 163
अमरावती विभाग : एकूण जागा 108
वेळापत्रक :
ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी :
दिनांक 09/12/2021 ते 31/12/2021
ऑनलाइन शुल्क भरण्याचा कालावधी :
दिनांक 09/12/2021 ते 01/01/2022
परिक्षेचा प्रस्तावित दिनांक :
रविवार दिनांक 23/01/2022
ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट: https://landrecordsrecruitment2021.in
Official website: https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/
Nagpur, Amravati – Notification
Pune Notification
Mumbai Notification
Aurangabad, Nashik Notification